Iternery
सोमवार, ३०/११/२०२६
मुंबई टर्मिनल २ वरुन रात्री ११.१० वा. VN 978 फ्लाईटने व्हिएतनामकडे प्रस्थान.
मंगळवार, १/१२/२०२६
टॅन सोन नॉट होचिमिन विमानतळावर आगमन. हॉटेलमध्ये चेक इन व नाश्ता झाल्यावर नोटरे डॅम, जनरल पोस्ट ऑफिस, सिटी हॉल, शेवटचा ऑपेरा हाऊस वॉर म्युझियम तसेच पुर्नमिलन राजवाडा पाहून रात्री मुक्काम सायगॉन येथे हॉटेलवर.
बुधवार, २/१२/२०२६
सकाळी नाश्ता करुन सायगॉन येथील भूमिगत बोर्गो, इमारती, कारखाने, फिल्ड हॉस्पिटल, कमांड सेंटर कसे बांधले आहेत याचा एक परिचयात्मक व्हिडीओ पाहून ते प्रत्यक्षात कसे आहेत याचा अप्रतिम आनंद आपण घेणार आहोत. दुपारच्या जेवणानंतर थियन हाऊ मंदिर, चायना टाऊन पाहून बेन थान बाजारात खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्काम सायगॉन येथे हॉटेलवर.
गुरुवार, ३/१२/२०२६
सकाळी नाश्ता व हॉटेल चेक आउट करून VN 122 फ्लाईटने दानांग कडे प्रस्थान. दुपारच्या जेवणानंतर नॉन नुओक स्टोन कार्व्हिंग व्हिलेजला भेट. नंतर बास्केट बोटी (गोल बोट) मधून बे माऊ या नारळाच्या जंगलात फिरताना येथील बास्केट बोट डायर्सिंग, रायडिंग, मासेमारी, हस्तकला इ. स्थानिक क्रियाकलापांचा आनंद घेणार. नंतर होइआन टाऊन, थु बान नदीकाठी असलेल्या बाजारात फेरफटका व खरेदीसाठी मोकळा वेळ. रात्री मुक्काम दानांग येथे हॉटेलवर.
शुक्रवार, ४/१२/२०२६
सकाळी नाश्ता व हॉटेल चेक आउट करून बा ना हिलकडे प्रस्थान. ४ जागतिक विक्रम करण्याच्या, प्रचंड हातांनी युक्त, १५० मीटर लांबीच्या गोल्डन ब्रिजवर फेरफटका. नंतर लिन्ह उंग पॅगोडा येथील २७ मीटर उंच बुद्ध मूर्ती, लोक उयेन गार्डन व्हान अम कँक, बा ना शिखर पाहणार. येथील आधुनिक खेळांचा आनंद घेणार. नंतर १४८७ मीटर उंचीवर असणाऱ्या चुआ शिखरावरील बा चुआ थुऑँग गॉन मंदिर, दानांग शहर, दानांग खाडीच्या पॅनोरम दृश्याचा आनंद घेऊन रात्री मुक्काम दानांग.
शनिवार, ५/१२/२०२६
सकाळी नाश्ता व हॉटेल चेक आउट करून VN 164 फ्लाईटने नोई बाई कडे प्रस्थान. दुपारच्या जेवणानंतर हो ची कॉम्प्लेक्समध्ये हो ची समाधी, वन पिलर पॅगोडा, बा दिन्ह स्क्वेअर, होआ लो प्रिझम म्युझियम, हनोई ओल्ड क्वार्टर आणि होआन कीम लेकमध्ये बग्गी कार्टने फिरण्याचा आनंद घेणार. हनोईच्या जुन्या क्वार्टरमध्ये खरेदीसाठी मोकळा वेळ व वॉटर पपेट शो पाहून रात्री मुक्काम हनोई हॉटेलवर.