Bhutan Tour

  | Bhutan Tour

Iternery

 

 

 

Day 01

छत्रपती शिवाजी टर्मिनल (मुंबई) ते बागडोगरा (AKASA AIR QP-1446 18 FEB BOM-IXB 08:35 11:30) विमान प्रवास करून बागडोगरा आगमन. फुन्शोलिंगकडे रवाना (१५० कि.मी. / ४ तास). राखीव टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने वाटेत सिलीगुडी, तीस्ता नदी, चहाचे मळे बघत (हासीमारा) इंडो-भूतान सीमेकडे (जयगाव-फुन्शोलिंग) ला पोहोचणार. नंतर हॉटेल चेकइन करून सायंकाळी जयगाव/फुन्शोलिंग मार्केटसाठी मोकळा वेळ. मुक्काम फुन्शोलिंग.

 

 

Day 02

फुन्शोलिंग-थिम्पू प्रवास (१७६ कि.मी. / ६ तास). सकाळी हॉटेल नाश्ता केल्यानंतर भूतान फिरण्यासाठी आवश्यक परमिट काढून लगेच थिम्पूकडे रवाना. गेदू येथील मॅनेजमेंट कॉलेज आणि भूतानचे निसर्ग सौंदर्य पाहत थिम्पू येथे हॉटेल चेकइन करून सायंकाळी थिम्पू मार्केटसाठी मोकळा वेळ. मुक्काम थिम्पू.

 

 

Day 03

थिम्पू येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट - सकाळी नाश्ता करून थिम्पू स्थळ दर्शन. थिम्पू शहर हे सध्या भूतानची राजधानी आहे. १९५१ पासून भूतान देशाची राजधानी होण्याचा मान ह्या सुंदर आणि विलोभनीय शहराला मिळाला. तत्पूर्वी १९५० पर्यंत पुनाखा शहर हे भूतानची राजधानी होते. येथील पुनाखा झोंग येथून भूतानचा राज्यकारभार होत होता. थिम्पू मधील प्रेक्षणीय स्थळे - नॅशनल मेमोरियल चोरटेन किंवा थिम्पू चोरटेन, शाक्यमुनी बुद्ध पुतळा, ताकीन प्राणी संग्रहालय पाहून रात्री मुक्काम थिम्पू.

 

 

Day 04

थिम्पू - पुनाखा - सकाळी नाश्ता करून पुनाखा शहराकडे प्रयाण. पुनाखा शहर म्हणजे भूतानची पहिली राजधानी. १६ व्या शतकापासून १९५० पर्यंत, पारो पासून २५ कि.मी. प्रवास केल्यानंतर दो चू ला पास आहे. हे ठिकाण युध्द स्मारक म्हणून ओळखले जाते. तिसऱ्या राजाच्या वेळी जी सीमेलगत युध्द झाली त्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ येथे १०८ छोट्या स्तुपा उभारल्या गेल्या आहेत. समोरच ह्या जागेचे रक्षण करण्यासाठी एक मोनेस्टरी बनवलेली आहे. पूर्ण परिसर फिरण्यासाठी १ तास वेळ लागतो. त्यानंतर पुनाखा शहराकडे प्रयाण. येथून २ तास प्रवास केल्यावर आपण पुनाखा ला पोहोचतो. येथील पुनाखा झोंगला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे. झोंग पूर्णपणे बघण्यासाठी १ तास वेळ लागतो. संध्याकाळी वेळ मिळाल्यास झुलता झुल्या पाहून हॉटेलकडे प्रस्थान. संध्याकाळी पारो येथे आगमन. रात्री मुक्काम पुनाखा.

 

 

Day 05

पुनाखा-पारो - सकाळी नाश्ता करून पारो शहराकडे प्रयाण. दुपारी पारो येथे आगमन. दुपारी जेवणानंतर थोडा आराम आणि संध्याकाळी पारो मार्केट. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी तसेच काही भूतानी ड्रेस किंवा वस्तू घेण्यासाठी जरूर भेट द्या. रात्री मुक्काम पारो.

 

 

Day 06

पारो येथील स्थळदर्शन - सकाळी नाश्ता करून पारो येथील प्रेक्षणीय स्थळे - भूतानचे राष्ट्रीय संग्रहालय : तादझोंग - रिन्पुंग झोंग - पारो शहराचा राजवाडा. दुपारी जेवणानंतर चे ले ला पास. रात्री भोजन आणि पारो येथे मुक्काम.

 

 

Day 07

पारो - सिलीगुडी : सकाळी नाश्ता करून सिलीगुडीकडे प्रस्थान. चुझोम पॉईंट, भूतानच्या थिम्पू चू (नदी) आणि पारो चू (नदी) या दोन नद्यांचा संगम. येथे तुम्हाला इंडो-भूतान फ्रेंडशिप ब्रिज पाहायला मिळेल. गेदू येथील मॅनेजमेंट कॉलेज (बाहेरून) प्रवास दरम्यान निसर्ग सौंदर्य तसेच पाण्याचे धबधबे. संध्याकाळी सिलीगुडी येथे आगमन आणि मुक्काम.

 

 

Day 08

सिलीगुडी - बागडोगरा विमानतळ : सकाळी लवकर नाश्ता झाल्यावर बागडोगरा विमानतळाकडे प्रयाण. बागडोगरा विमानतळावर पोहोचणार. सर्व इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून (AKASA AIR QP-3002 25 FEB IXB BOM 14:35-17:55) २.३५ वा. निघून मुंबई येथे ५.५५ वा. सुखरूप परत.

 

Photo Gallery

Enquiry Form