Iternery
Day 01
रात्री ९.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल २ येथे पोहोचणार. सर्व इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून रात्री THAI LION SL 219 22APR BOM-DMK 0040 0630 या फ्लाईटने बँकॉककडे प्रस्थान.
Day 02
बँकॉक मध्ये आगमन व पटायाकडे प्रस्थान. भारतीय रॉयल टायगर टोपिया रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करून दोन तासाचा बस प्रवास करून पटाया येथील हॉटेलमध्ये चेक इन करणार. फ्रेश झाल्यानंतर सायंकाळी जगप्रसिद्ध अल्काझार शो पाहण्यासाठी प्रस्थान. शो पाहून भारतीय रेस्टॉरंटमध्ये रात्रीचे जेवण करून मुक्काम पटाया.
Day 03
सकाळी ब्रेकफास्ट नंतर स्पिड बोटने कोरल बेटाकडे प्रस्थान. येथील निळेशार पारदर्शक पाण्यात मनसोक्त पोहण्याचा आनंद घेऊन (वॉटर स्पोर्ट्स-पॅरासेलिंग, बनाना राईड, स्कुबा डायव्हिंग स्वखर्चाने करू शकता.) दुपार नंतर नाँग नूच व्हिलेजला भेट. मुक्काम पटाया.
Day 04
सकाळी ब्रेकफास्ट नंतर आशियातील सर्वात मोठी व आकर्षक हिऱ्यांची गॅलरी पाहण्यासाठी जाणार. हिरे व विविध रत्ने खरेदीसाठी वेळ. हे सर्व पाहून झाल्यानंतर बँकॉक शहर दर्शनाचा आनंद. यामध्ये जगातील सर्वात मोठी बुद्ध मुर्ती (गोल्डन बुद्ध) आणि मार्बल बुद्धा मंदिरे पाहणार. स्थानिक भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवण करून मुक्काम बँकॉक.
Day 05
सकाळी ब्रेकफास्ट नंतर सफारी वर्ल्ड आणि मरिन वर्ल्डला भेट. डॉल्फिन शो, सी लायन शो, काऊबॉय स्टंट शो येथे आपल्याला पाहायला मिळतील. तसेच विविध प्रकारचे प्राणी, पक्षी सफारी पार्कच्या खुल्या अभयारण्यात पाहता येतील. संध्याकाळी चाओप्राया नदीवर बोट क्रूझ सफारी दरम्यान आंतरराष्ट्रीय संगीतासहित स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेणार. रात्री मुक्काम बँकॉक.
Day 06
सकाळी ब्रेकफास्ट नंतर बँकॉक हॉटेलमधून चेकआऊट करणार. लगेज लॉकरमध्ये ठेवून खरेदीसाठी मोकळा वेळ. संध्याकाळी बँकॉक येथील विमानतळावर पोहोचणार. सर्व इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून THAI LION SL 218 26APR DMK-BOM 2050 2335 या फ्लाईटने मुंबईकडे प्रस्थान. सहलीतील आनंद दायक व आश्चर्यकारक अनुभव मनात साठवत ही अविस्मरणीय सहल समाप्त होते.